एसबीआयच्या एटीएममध्ये आता नाही निघणार 2000च्या नोटा


नवी दिल्ली – एसबीआयच्या एटीएमचा वापरणार्‍या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआयच्या एटीएममधून आता तुम्हाला 2000 च्या नोटा मिळणार नाहीत. एसबीआय बँकेसह एटीएममध्ये हळू हळू मोठ्या नोटा कमी होतील. यासंदर्भातील वृत्त अमर उजाला या संकेतस्थळाने दिले आहे

आरबीआयच्या संकेतानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या एटीएममधून मोठ्या नोटांच्या कॅसेट काढण्यास सुरवात केली आहे. उन्नाव जिल्ह्यातच जवळजवळ सर्व एटीएममधून कॅसेट काढून टाकण्यात आल्या आहेत.

आता तयारी 500 रुपयांच्या नोटांची आहे. एटीएममध्ये फक्त 100 आणि 200 रुपयांच्या नोटा राहतील. मिळालेल्या माहितीनुसार छोट्या नोटांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

उन्नावमधील स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक सुनील कुमार म्हणाले की सुमारे एक वर्षापासून एसबीआयच्या एटीएममध्ये 2000 च्या नोटा ठेवलेल्या नाहीत. आता एटीएम मशीनमध्ये 2000 च्या नोटांची कॅसेट (बॉक्स) काढली जात आहे जेणेकरुन इतर नोट्स ठेवता येतील.

Leave a Comment