कसोटी क्रिकेटचा सिक्सर किंग बनला रोहित शर्मा, मोडला सिद्धूचा 25 वर्ष जुना विक्रम


विशाखापट्टनम – सलामीवीर म्हणून पहिला सामना खेळणारा रोहित शर्मा आतापर्यंत विशाखापट्टणम कसोटीत उत्तीर्ण झाला असून पहिल्या डावात 176 धावा करणारा ‘हिटमॅन’ दुसऱ्या डावातही चमकत आहे. दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावल्यानंतर नाबाद असलेला रोहित आता कसोटी क्रिकेट सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

रोहितने नवज्योतसिंह सिद्धूचा विक्रम मोडला आहे. लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध 1994 मध्ये सिद्धूने 8 षटकार लगावले. रोहित एकदिवसीय आणि टी -२० मधील सर्वाधिक षटकार मारणार भारतीय फलंदाजही आहे. 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू येथील एकदिवसीय सामन्यात त्याने 16 षटकार लगावले होते. यानंतर, इंदूरमध्ये खेळलेल्या 2017मध्ये टी -20सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध 10 षटकार ठोकले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विशाखापट्टणम यथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात रोहित शर्माने आतापर्यंत 4 षटकार ठोकले असून, त्यासह तो एकाच कसोटी सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 9 षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे.

याआधी रोहित शर्माने कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्या डावात सहा षटकार ठोकले होते, त्या खेळीत त्याच्या बॅटमधून 23 चौकारांव्यतिरिक्त सहा षटकार देखील आले होते. शनिवारी पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बातमी लिहिली गेली होती तेव्हापर्यंत भारताने दुसऱ्या डावात एक विकेट गमावत 175 धावा जमावल्या आहेत, तर पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेपेक्षा 247 धावा पुढे आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघेही अर्धशतकांनंतर आपापल्या शतकाच्या दिशेने प्रगती करत आहेत.

Leave a Comment