अशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये सर्वाधिक १३५ उमेदवार


मुंबई – शुक्रवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी शुक्रवारपर्यंत ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत संपली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना दिलीप शिंदे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात शुक्रवारी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे शुक्रवार अखेर दाखल केली.

Leave a Comment