आयफोनच्या या मॉडेलमध्ये खराबी, विनामूल्य दुरुस्त करुन देणार अॅपल


अॅपलच्या आयफोन 6 एस आणि 6 एस प्लस मॉडेल्सच्या काही भागांमध्ये बिघाड झाल्यानंतर कंपनीने विनामूल्य दुरुस्त करुन देण्याची घोषणा केली आहे, परंतु आतापर्यंत आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लसच्या कोणत्या भागात दोष आढळला ते अद्याप कंपनीकडून उघड करण्यात आलेले नाही.

विशेष म्हणजे अॅपलच्या सपोर्टवर देखील त्याबद्दलची कोणतीही विशिष्ट माहिती देण्यात आलेली नाही. अॅपलच्या सपोर्ट पेजवर तुम्हाला तुमच्या आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लसचा सिरियल नंबर प्रविष्ट करुन आपण आपल्या आयफोनमध्ये काय बिघाड ते तपासू शकता. त्याच वेळी, अॅपलने फोनच्या कोणत्या भागात दोष आहे हे सांगितले नाही. अॅपलच्या सपोर्ट पेजवर दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मॉडेल्समध्ये नो पावरची समस्या असून ज्यामुळे फोन चालू होत नाहीत.

असे म्हटले जात आहे की आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लसचे मॉडेल ज्यात खराबी असल्याची तक्रार आहे, ते ऑक्टोबर 2018 ते ऑगस्ट 2019 दरम्यान तयार करण्यात आले आहेत. दरम्यान हे दोन्ही फोनचे उत्पादन आता बंद करण्यात आले आहे. या लिंकवर क्लिक करून आपण आपल्या फोनमध्ये काय बिघाड आहे ते तपासू शकता.

विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा अॅपलच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारचा दोष आढळतो तेव्हा कंपनी एकतर विनामूल्य दुरुस्त करुन देते किंवा भाग कमी पैशात पार्ट बदलून देते. मागील वर्षाच्या सुरूवातीला कंपनीने 50 टक्क्यांत बॅटरी रिप्लेस करुन दिल्या होत्या

Leave a Comment