यंदाची अयोध्येतील दिवाळी नोंदविणार नवे रेकॉर्ड


रामनगरी अयोध्येत दिवाळीच्या खास उत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यंदाची दिवाळी अनेक अर्थानी खास असेल असे सांगितले जात आहे. यंदा दिवाळीत ३ लाख २१ हजार दिवे उजळून नवे जागतिक रेकॉर्ड नोंदविले जात आहे. २४ ते २६ ऑक्टोबर या काळात या नगरीत १ हजाराहून अधिक विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. यंदा ५ देशातील रामलीला कलाकार अयोध्येत त्यांची कला सादर करणार आहेत.


मॉरिशस, इंडोनेशिया, थायलंड, सुरिनाम आणि नेपाळ अश्या पाच देशातून यंदा रामलीला कलाकार येत आहेत. थायलंडचे महाराज वजिरालोंगकान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून अयोध्येत आलेले चित्रकार त्रेतायुगातील अनेक प्रसंग भिंती, इमारतींवर जिवंत करत आहेत. दीपोत्सव पर्व अधिक आकर्षक करण्यासाठी गावात १२ ठिकाणी रामलीला, भजन, नृत्यनाटिकासह अनेक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. काही ठिकाणी जत्रा आयोजित केल्या गेल्या आहेत असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले गेले आहे.

Leave a Comment