मोदींच्या मुखवट्यात रंगला गरबा


सध्या नवरात्रीची धूम सुरु असून गुजरातचा या काळात खास खेळला जाणारा गरबा जोमात खेळला जात आहे. नवरात्राचे नऊ दिवस गुजराथेत विविध ठिकाणी गरबा खेळला जातो आणि आता गुजराथ बाहेरही गरबा खेळण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे.

गरब्याची राजधानी म्हटले जाणाऱ्या हिरेनगरी सुरत मध्ये शुक्रवारची रात्र विशेष लक्षणीय ठरली. या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचे मुखवटे घालून गरबा खेळला गेला. लहान मुले, महिला, तरुण तरुणी साऱ्यांनी मोदी यांचे मुखवटे घातले होते. देशभरात दिवाळीला जशी विशेष तयारी होते तशी तयारी गुजराथ मध्ये नवरात्रीत होत असते. गरबा रात्री जागविण्याची तयारी जोरदार असते. त्यात गरब्यासाठी सुंदर ड्रेस, चनिया चोळी, विविध प्रकारच्या बांगड्या, आभूषणे जशी खरेदी केली जातात तसेच विशेषतः युवती विविध प्रकारचे टॅटू पाठीवर, हातावर काढून घेतात.


यंदा येथेही मोदी यांनी बाजी मारली असून मोदी ट्रम्प भेटीचा टॅटू विशेष मागणीत आहे. त्याचबरोबर काश्म्रीर ३७० कलम, चांद्रयान दोन, नवीन वाहन नियम कायदा तसेच पाणी वाचवा, से नो टू प्लास्टिक असे सामाजिक संदेश देणारे टॅटू मोठ्या प्रमाणावर काढले जात आहेत. जगभरातील पर्यटक गुजरातचा हा कलरफुल गरबा पाहण्यासाठी येथे भेट देत आहेत.

Leave a Comment