मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी…

brain
आपले शरीर जसे तंदुरुस्त हवे तसे मन सुद्धा सुदृढ हवे असते. चांगले जीवन जगण्यासाठी, जीवनातला आनंद लुटण्यासाठी आणि आयुष्यातली आव्हाने झेलून ती पार पाडण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याची गरज असते. असे सक्षम होण्यासाठी खालील उपाय आवश्यक आहेत. पहिला उपाय म्हणजे सर्व प्रकारच्या तणावापासून दूर रहा. तणाव वाढत गेल्यास हृदयविकार आणि रक्तदाबासारखे तणावामुळे होणारे विकार जडण्याची शक्यता असते. तणावाचे व्यवस्थापन हे एक जीवनातले महत्वाचे कौशल्यच आहे. ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. तिलाच आपण मानसिकता असे म्हणतो

ही मानसिकता आपल्या जीवनविषयक ध्येयावर अवलंबून असतो. केवळ स्वत:पुरते न जगता लोकांसाठी जगण्याची जिद्द मनात असली की जगण्यामागचे ध्येय उदात्त होऊन जाते आणि मानसिकता बदलून तणाव कमी होतो. मनाच्या आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम सुद्धा आवश्यक असतो. शारीरिक व्यायामाने शरीरामध्ये मानसिक विकारांवर मात करू शकणारी हार्मोन्स पाझरतात आणि त्यामुळे तणाव कमी होतो. अशाच प्रकारचा उपाय कोडी सोडवणे किंवा व्हिडिओ गेम खेळणे यातूनही होऊ शकतो.

चार चौघात मिसळण्याने सुद्धा मानसिक तणाव कमी होत असते. मित्रांबरोबर सहलीला जाणे, कुुटुंबाला सोबत घेऊन धार्मिक स्थळाला भेट देणे यातून आपल्या मनातली एकाकी पणाची भावना ओसरते आणि मानसिक आरोग्य सुधरायला लागते. मित्रांशी किंवा कुटुंबातल्या सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्याने सुद्धा मानसिकता बदलू शकते.

मानसिक आरोग्यासाठी सर्वाधिक महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती झोप. झोपेशिवाय मेंदूचा थकवा कमी होत नाही आणि मेंदूचा थकवा कमी झाल्याशिवाय आपण मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होऊ शकत नाही. झोप व्यवस्थित झाली नसल्यास थकलेपणा जाणवतो आणि मेंदूला शिणवटा येतो. तेव्हा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याकरिता उत्तम झोप गरजेचीच आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment