भारतीय सेनेला भाभा कवचाची सुरक्षा


देशाच्या सुरक्षा दलांसाठी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट्स तयार करण्याचे काम भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरने पूर्ण केले असून ही बुलेटप्रूफ जॅकेट्स भाभा कवच नावाने उपलब्ध केली जात आहेत. ही नेक्स्ट जनरेशन बुलेटप्रूफ जॅकेट्स वजनाला हलकी आहेतच पण विदेश जॅकेट्सच्या तुलनेत स्वस्त आहेत. अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे नाव या जॅकेट्सना दिले गेले आहे. ही बुलेटप्रूफ जॅकेट्स आपल्या सैनिकांना एसएलअर्, इन्सास रायफल्स सोबतच एके ४७ गोळ्यापासून संरक्षण देतील.

या बुलेटप्रूफ जॅकेट्सची किंमत ७० हजार आहे. आयात परदेशी बुलेटप्रूफ जॅकेट्सची किंमत दीड लाख रुपये आहे. शिवाय ती वजनाला १७ ते २० किलो असतात त्या तुलनेत भाभा कवचचे वजन ६ ते ७ किलो आहे. ही जॅकेट्स वापरायला सोपी आणि सहज आहेत. ३ वैज्ञानिकांच्या चमूने २०१५-१६ पासून या प्रोजेक्टवर काम करून ती तयार केली आहेत. सीआरपीएफ, इंडो तिबेट बोर्डर पोलीस, सीआयएसएफ येथे या बुलेटप्रूफ जॅकेट्सचे परीक्षण सुरु झाले आहे. जम्मू काश्मीर मध्ये तैनात सैनिकांना सुद्धा ती चाचण्या घेण्यासाठी दिली गेली आहेत. आतापर्यंत ही बुलेटप्रूफ जॅकेट्स ३० कठोर चाचण्यात उत्तीर्ण झाली असून पुढची १० वर्षे दरवर्षी सेनेला १ लाख बुलेटप्रूफ जॅकेट्सची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment