बदामाचा केसांना आणि त्वचेला उपयोग

badam
बदाम हे आरोग्यासाठी उत्तम असतात हे आपल्याला परंपरेने माहीत आहे. अंग धरत नसलेल्या मुलाला बदामाचा शिरा खाऊ घालण्याची पद्धत आपल्याकडे आहे. बदामाने शरीर गुटगुटीत होते ही गोष्ट खरीच. काही लोक तर दुधामधून बदामाचे पीठ मिसळून ते दूध पितात. असे स्नायूला आणि आतील अवयवांना बदामाचा उपयोग होतो. तसाच तो केसांना आणि त्वचेला सुद्धा होत असतो असे तज्ज्ञांचे मत आहे आणि अनेकांचा तसा अनुभवही आहे.

बदामामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविणारे घटक असतातच, पण त्याच बरोबर व्हिटामीन-इ मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचबरोबर प्रथिने आणि उपयुक्त चरबी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विविध विकारांवर करावयाचा एक उत्तम उपाय म्हणून बदामाचे सेवन करणे उपयुक्त ठरत असते. विशेषत: सौंदर्याशी संबंधित असलेले प्रश्‍न सोडविण्याच्या बाबतीत बदाम उपयुक्त ठरते.

रात्रभर भिजत ठेवलेले मूठभर बदामाचे बी सकाळी उठून खाल्ल्यास ते अंगी लागते. मात्र याच भिजलेल्या बदामाचे चूर्ण करून त्याचा लेप चेहर्‍याला दिल्यास चेहर्‍याची त्वचा तुकतुकीत होते. हाच लेप केसाला दिल्यास केसही चमकतात. काही लोकांचे केस चमक गमावून बसतात त्यांच्यासाठी हा उपाय चांगला आहे. चार-पाच बदाम घेऊन ते वाटून त्यात थोडे दूध मिसळून लिंबाचा रस आणि थोडे बेसन पीठ घालून हा लेप चेहर्‍याला लावला तर चेहरा तुकतुकीत होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

4 thoughts on “बदामाचा केसांना आणि त्वचेला उपयोग”

  1. चेहरा खुप काळवंडलेला आहे उपाय सांगा प्लीज

  2. अक्षता सावंत

    माझ्या चेहर्यावर छोटेछोटे चामखीळ आहेत त्यावर उपाय सांगा प्लीज

Leave a Comment