पोट रिकामे पण मेंदू कार्यक्षम

mind
आपल्या जीवनातले महत्वाचे बदल घडताना आपण जे निर्णय घेतो ते भरल्यापोटी घेण्यापेक्षा रिकाम्या पोटी घेणे जास्त श्रेयस्कर असते. माणसाची कसोटीच्या काळातली निर्णय क्षमता तो उपाशी असताना अधिक विवेकशील असते असा निष्कर्ष डच शास्त्रज्ञांनी काढला आहे. युट्रेज विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, उपवास करण्याने निर्णय क्षमता सुधारते. या संबंधात त्यांनी काही विद्यार्थ्यांवर प्रयोग केले.

विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले. त्यातला एक गट उपवास करणारा होता, तर दुसरा गट खाणारा-पिणारा होता. या खादाड गटाला भरपूर ब्रेकफास्ट दिला गेला आणि त्या ब्रेकफास्टनंतर दहा तासांनी त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये खाद्यपदार्थांची रेलचेल होती आणि त्यांना भरपूर खाण्याची मुभा होती. या दोन गटांमध्ये निर्णय क्षमता तपासणारे काही खेळ घेतले गेले तेव्हा खादाड गट मागे पडला आणि उपवास करणार्‍या गटाने या खेळात चांगले गुण मिळवले.

या खेळांमध्ये मुलांना दिलेल्या प्रश्‍नांमध्ये दूरगामी फायद्याचे निर्णय आणि तात्पुरत्या फायद्याचे निर्णय यातून निवड करण्याचे काही प्रश्‍न होते. खादाड गटाने तात्पुरत्या फायद्याचे निर्णय घेतले तर उपवास करणार्‍या गटाने विचारपूर्वक दूरगामी फायद्याचे निर्णय घेतले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment