पतौडी पॅलेसमध्ये लाँच होणार टीव्ही शो


बॉलीवूड अभिनेता आणि पतौडी खानदानाचा वारसदार सैफ अली खान याच्या अलिशान पैतृक महालात प्रथमच एका टीव्ही शोचे लाँचिंग होत असल्याने हा महाल पुन्हा चर्चेत आला आहे. ‘ये जादू है जिन का’ असे या टीव्हीशो चे नाव असून या महालाच्या इतिहासात भारतीय टीव्ही शो भारतातल्या सर्वाधिक शानदार महालात लाँच केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पतौडी पॅलेस हरियानाच्या गुरगाव मध्ये असून त्याला इब्राहीम महाल असेही म्हटले जाते. काही दिवसापूर्वी बेगम करीना कपूरचा वाढदिवस या महालात साजरा केला गेला तेव्हा हा महाल चर्चेत आला होता आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी सैफ या ठिकाणी आला तेव्हा या महालाचा रस्ताच तो विसरला होता म्हणूनही हा महाल चर्चेत आला होता. सैफ अली खान याच्याकडेच या महालाच्या देखभालीची जबाबदारी आहे.

ये जादू है जिन्न का या शोचा टीझर नुकताच प्रदर्शित केला गेला आहे. यात तरुण, स्वभावने सौम्य प्रकृतीचा पण बेरकी नबाब अमन जुनैदखान याची कहाणी सांगितली गेली आहे. या नबाबावर वाईट जिनची सावली पडलेली असते. रोशनी नावाची एका वेश्येची मुलगी त्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढते. ही कथा रोमांचक आहे त्यामुळे अश्या अलिशान जागी तिचे लाँचिंग होणे अधिक योग्य आहे असे निर्मात्याचे म्हणणे आहे. स्टार प्लसवर हा शो सुरु होत आहे.

Leave a Comment