खाण्यास कोणते तेल योग्य?

oil
आरोग्याच्या क्षेत्रात अनेक गैरसमज आहेत. त्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे तेलाविषयीचा. तेल हे आरोग्यास घातक असते. विशेषत: हृदरोगासाठी ते धोकादायक असते असा सार्वत्रिक गैरसमज आहे. कारण तेलामध्ये चरबी असते आणि ती शरीरात साचत गेली की, जाडी वाढते. या गोष्टी खर्‍या असल्या तरी तेल हे शरीरासाठी काही बाबतीत तरी आवश्यक असते. कारण तेलातली चरबी शरीराला घातक नसून योग्य प्रमाणात घेतली तर हृदयाला बळकटी आणू शकते. म्हणून तेलाविषयीचे गैरसमज काढून टाकले पाहिजे.

तेल हे शरीराला उपयुक्त असते, पण ही गोष्ट आपण कोणते तेल वापरतो यावर अवलंबून असते. भाताच्या तुसापासून काढलेले तेल, सूर्यफुलाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल ही तेले हृदयाला उपयुक्त ठरतात. या तेलांमध्ये आवश्यक ते पोषण द्रव्ये असतात. विशेषत: ऑलिव्ह ऑईल हे तर भाज्यांपासून तयार केलेले तेल आहे. ते शुद्ध स्वरूपात वापरल्यास त्यापासून धोका होत नाही. या तेलामध्ये अन् सॅच्युरेटेड फॅटस् कमी असतात.

सूर्यफुलाचे तेल साधारणत: स्वयंपाकासाठी वापरत नाहीत. परंतु या तेलाचा वापर करण्याची सवय ठेवल्यास हृदरोगापासून बचाव होऊ शकतो. सूर्यफुलाचे तेल हृदयाचे क्रियाकलाप व्यवस्थित चालविण्यास सहाय्य करते. सूर्यफुलाच्या तेलातील ओमेगा-३ हे द्रव्य अनेक बाबतीत उपयुक्त आहे. भाताच्या तुसापासून केलेल्या तेलातही हाच गुणधर्म असतो. ही तेले वापरावीत अशी तर सूचना केली जातेच, परंतु शेंगदाण्याचे तेल आणि खोबर्‍याचे तेल अजिबात वापरू नये, अशीही सूचना आहार तज्ज्ञांकडून केली जात असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment