व्हॉट्सअ‍ॅपमधील या बगमुळे गायब होऊ शकतात फोटो आणि व्हिडीओज्

मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पुन्हा एकदा बग आढळल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक बग असा आहे, ज्याद्वारे हॅकर्स एका GIF फाईलच्या मदतीने सर्व चॅट गायब करू शकतात. या बगची माहिती सिक्युरिटी रिसर्चर Awakened ने दिली आहे.

यावर व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, हे बग मागील महिन्यातच काढण्यात आले असून, त्यामुळे युजर्सला चिंता करण्याचे काहीही कारण नाही. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, या बगमुळे युजर्सची कोणतीही माहिती लिक झाली नसून, त्यांची गोपनियता सुरक्षित आहे. कंपनीने आपल्या एक अब्ज युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

रिपोर्टनुसार, GIF फाईल हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅपला हॅक करून गॅलेरीमध्ये जाऊ शकतात आणि तुमचे फोटो व व्हिडीओज बघू शकतात. हॅकर्स हॅकिंगसाठी ज्या GIF फाईलचा वापर करत आहेत त्यामध्ये व्हायरस आहे.

GIF फाईल पाठवल्यानंतर हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅपद्वारे युजर्सकडून फोनच्या गॅलेरीमध्ये वाट बघतात आणि त्यानंतर ते गॅलेरीमधील तुमचे फोटो व व्हिडीओ पाहू शकतात. रिपोर्टनुसार, हा बग व्हॉट्सअ‍ॅपच्या 2.19.230 व्हर्जनमध्ये होता. त्यामुळे आता कंपनी अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment