या कंपन्या अवघ्या 1 मिनिटात करतात 15 कोटींपेक्षा जास्त कमाई !


छोट्या देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचा व्यवसाय आहे. त्याबद्दल जाणून घेण्याची आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असते. अमुक कंपनी एक मिनिटात किंवा दिवसभरात किती कोट्यावधी रुपयांची कमाई करते हा प्रश्न कायम अग्रस्थानी असतो. अशाच काही कंपन्यांबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ज्या दर मिनिटाला आणि दिवसाला कोट्यवधी रुपये कमवतात.

सौदी अरेबियाची कंपनी अरामकोचे एका मिनिटात सर्वाधिक कमाई करणार्‍या कंपन्यांपैकी पहिले नाव आहे. 21.58 अब्जपेक्षा जास्त कमाई एका दिवसात करणार्‍या या कंपनीची 15 कोटींपेक्षा मिनिटांची कमाई जास्त आहे.

जगातील बड्या कंपन्यांपैकी टेक कंपनी अॅपलदेखील एक आहे. 80.63 लाख रुपयांपेक्षा जास्त एका मिनिटात अॅपलची कमाई आहे. तर एका दिवसात 11.16 अब्ज रुपयांपेक्षा जास्त अॅपलची कमाई आहे.

चीनची औद्योगिक व वाणिज्य बँक असे दर मिनिटाला सर्वाधिक काम करणार्‍या कंपन्यांमध्ये नाव आहे. दर मिनिटाला ही बँक 60.95 लाख + कमावते. एका दिवसात 8.77 अब्ज रुपये कमाई करते.

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर नाव आहे. दर मिनिटाला सॅमसंग 54.03 लाख आणि दिवसाला 7.78 अब्ज रुपये कमावते.

पाचव्या स्थानावर चीनची आणखी एक बँक आहे. या कंपनीचे नाव बँक ऑफ चायना कन्स्ट्रक्शन (सीसीबी) असे आहे. दर मिनिटाला सीसीबी 52.14 लाख आणि दिवसभरात 7.50 अब्ज रुपये कमावते.

Leave a Comment