‘वॉर’ चित्रपटाची अनेक विक्रमांना गवसणी


प्रेक्षकांनी ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूडमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि खतरनाक स्टंट्स असलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम रचले आहेत. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 53.35 कोटींची कमाई करत आजपर्यंतचे कमाईचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत. हिंदीसह तेलुगु आणि तामिळ भाषेतही हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.

हा ह्रतिक आणि टायगर या दोघांचाही सर्वाधिक कमाईचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. अमिताभ आणि आमिरच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ने पहिल्याच दिवशी 52.25 कोटींची कमाई करत विक्रम केला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी सपशेल नाकारले होते. पण वॉर चित्रपटाला प्रेक्षकांनी स्वीकारल्याचे चित्र देशभर पाहायला मिळाले. वॉर चित्रपटाने हिंदीत पहिल्या दिवशी 51.60 कोटी तर दुसऱ्या दिवशी अंदाजे 23 कोटींची कमाई केली. तर तामिळ आणि तेलुगुमध्ये चित्रपटाने 1.75 कोटींची कमाई केली. भारतात एकूण अंदाजे 76.35 कोटींची कमाई केल्याने बॉलिवूडचा हा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.

2 ऑक्टेबरला गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी वॉर हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाला पहिल्या आठवड्याची कमाई करण्यासाठी पुरेपुर 5 दिवस मिळाले आहेत. शनिवार रविवारची सुट्टी आणि विकेंडमुळे चित्रपट पहिल्या आठवड्याच्या कमाईतही विक्रम स्थापन करु शकतो. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी एवढी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. ह्रतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि यशराज फिल्म्ससाठी वॉर हा चित्रपट वरदान ठरला आहे. त्यांच्या करियरमधील हा चित्रपट सर्वाधिक हायेस्ट ओपनर ठरला आहे.

दाक्षिणात्य सैरा नरसिम्हा रेड्डी या चिरंजीवीच्या चित्रपटासोबत वॉर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर मुकाबला होता. तसेच हॉलिवूडच्या जोकर या चित्रपटाशीही सामना होता. पण वॉर या सगळ्याशी यशस्वी युध्द करण्यात यशस्वी ठरला. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूडच्या या चित्रपटांना वॉरने मागे टाकले आहे. आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणारे अलिकडे रिलीज झालेले चित्रपट होते. वॉर हा चित्रपट भारतात 4000 स्क्रिन्स (हिंदी, तामिळ तेलुगुसह) आणि परदेशात 1350 स्क्रिन्सवर रिलीज झाला. या चित्रपटाने ऑस्ट्रेलियात धमाल उडवून दिली आहे. 2019 चा हायेस्ट ओपनर बॉलिवूड चित्रपट बनला आहे.

Leave a Comment