इम्रान खानच्या धमकीला टीम इंडियाच्या खेळाडूंचे सडेतोड उत्तर


नवी दिल्ली – टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिलेल्या धमकीला प्रतिउत्तर दिले आहे. इम्रानने नुकतीच UNGC येथे भाषण देताना द्वेषाच्या भाषेचा वापर केला होता.


महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त मोहम्मद शमीने एक ट्विट केले होते. त्यात त्याने, महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनात प्रेम, बंधुता आणि शांतीचा संदेश दिला. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरुन धमकी देत द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला. पाकिस्तानला विकासाची इच्छा असलेल्या नेत्याची गरज आहे. नोकरी आणि आर्थिक वाढीची चर्चा, युद्ध आणि दहशतवादाला आश्रय देणार नाही.


त्याचवेळी हरभजन म्हणाला, यूएनजीएच्या भाषणात भारताविरूद्ध अण्वस्त्र युद्धाचे संकेत दिले. मुख्य वक्ते म्हणून इम्रान खान यांनी ‘रक्तरंजित संघर्ष’, ‘अंत लढा’ अशा शब्दांचा वापर दोन देशांमधील द्वेषाप्रमाणेच केला. एक खेळाडू म्हणून मी शांतीचा प्रस्ताव करतो आणि तशी अपेक्षा देखील मी केली.

Leave a Comment