संघ मुख्यालयाला मिथुन चक्रवर्ती यांची अचानक भेट


नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला ज्येष्ठ सिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सदिच्छा भेट दिली. मिथुन चक्रवर्ती यांचे काल सकाळी नागपूरला आगमन झाले. रेशीमबाग येथील स्मृती मंदिरमध्ये जाऊन त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गुरुजींच्या स्मृती स्थळाला अभिवादन केले. चक्रवर्ती यांनी यावेळी संघ कार्याविषयी जाणून घेऊन प्रमुख संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

संगम मुख्यालयातील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या भेटीमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. काल ते अचानक संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याची माहिती जाणून घेतली. बराच वेळ त्यांनी संघाच्या रेशीमबाग येथील हेडगेवार भवनात घालवल्यानंतर त्यांनी स्मृती मंदिराला देखील भेट दिली. चक्रवर्ती यांनी यावेळी संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Leave a Comment