रिझर्व्ह बँकेचा पीएमसी बँकेच्या खातेदारांना अंशतः दिलासा


नवी दिल्ली – पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेडच्या (पीएमसी) ठेवीदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेने याआधी दिलेल्या निर्णयामुळे त्यांच्या खात्यातील एकूण शिल्लक रकमेपैकी फक्त १० हजार रुपये काढता येत होते.


दरम्यान, बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा आढावा घेतल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांची अडचण कमी करण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा २५ हजार रुपयांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या ७० टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना या सवलतीमुळे त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेता येणार आहे. पीएमसी बँकेच्या स्थितीवर रिझर्व्ह बँक ही लक्ष ठेवून आहे. ठेवीदारांच्या हितासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment