3 कोटींच्या कारचा मालक झाला रणवीर सिंह

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने एक लाल रंगाची Lamborghini Urus ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 3 कोटी रूपये सांगितली जात आहे.  Lamborghini Urus ला जगातील पहिली सूपर युटिलिटी व्हीकल म्हणून देखील ओळखले जाते. त्याला मुंबईच्या रस्त्यावर ही शानदार कार चालवताना पाहण्यात आले.

(Source)

रणवीर सिंहच्या या कारची नंबर प्लेट अद्याप आलेली नाही. रणवीर सिंहने ही कार चालवताना लाल रंगाचीच टोपी देखील घातली होती. रणवीर सध्या कबीर खानच्या ’83’ या चित्रपटात व्यस्त आहे.

(Source)

कारबद्दल सांगायचे तर लेम्बोर्गिनी उरुस खूपच पॉवरफुल आहे. यामध्ये 4.0 लिटरचे V8 ट्विन-टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. जे 641bhp ची पॉवर आणि 850Nm चा टॉर्क देते. याचबरोबर 8-स्पीड टॉर्क कंवर्टर गियरबॉक्स देखील आहे. केवळ 3.6 सेंकदात ही कार ताशी 100 किमीचा वेग पकडते. या कारचा टॉप स्पीड ताशी 305 किलोमीटर आहे.

(Source)

या कारचे वैशिष्ट्य म्हणजे यात 21 इंचचे एलाय व्हील्स लावण्यात आले आहेत, ज्यांना 23 इंचापर्यंत वाढवता येतात. याशिवाय यात 440mm चे फ्रंट आणि 370mm चे रिअर कार्बोन सेरामिक ब्रेक्स लावण्यात आलेले आहेत जे 100 च्या स्पीडमध्ये देखील केवळ 33.7 मीटरमध्ये कार थांबवतात.

(Source)

या कारमध्ये स्ट्राडा, टेरा (ऑफ-रोड), नेवा (स्नो), स्पोर्ट, कॉर्सा आणि साबिया (सेंड) या 6 ड्रायव्हिंग मोडचा समावेश आहे. या कारची हटके स्टाईल कोणालाही वेड लावू शकते.

Leave a Comment