घराची वीजपुर्ती करणार ही कार, एकदा चार्ज केल्यावर धावणार 400 किमी

पुढील काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारचा बाजार वाढणार आहे. अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणत आहेत. जगभरात मोठ्या प्रमाणात विक्री होणारी इलेक्ट्रिक कार निसान लीफ  (Nissan Leaf) देखील पुढील वर्षी भारतात लाँच होणार आहे. इलेक्ट्रिक कार असण्याबरोबरच या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार तुमच्या घरात देखील वीज पुरवठा करू शकते.

(Source)

निसान कंपनीचा दावा आहे की, त्यांची ही कार चालती-फिरती पॉवर हाऊस आहे. यामध्ये 40 kWh ची बॅटरी आहे, जी एखाद्या घराला देखील वीज देऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, वीज वारंवार जाण्याची समस्या किंवा सौर उर्जेवर निर्भर असणाऱ्यांसाठी ही कार वरदान आहे.

निसानचे इलेक्ट्रिकल व्हीक्लस ऑपरेशन्स बघणारे रुसुके हयाशी सांगतात की, 2011 मध्ये जेव्हा जापानच्या उत्तर पुर्व भागात भुकंप आला होता. त्सुनामी आणि भूकंपामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी फर्स्ट जनरेशन निसान लीफ लाँच होऊन,केवळ तीन महिने झाले होते. त्सुनामी आणि भूकंपामुळे 48 लाख घरांची वीज गेली होती. अशावेळेस 66 निसान लीफ कारने या भागामध्ये वीज पुरवठा केला.

(Source)

निसान लीफमध्ये व्हीकल टू एवरीथिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे, ज्याला V2X असे म्हणतात. या टेक्नोलॉजीच्या मदतीने इलेक्ट्रिक व्हीकल ग्रिडद्वारे पॉवर घेऊ शकतात व ग्रिडला पॉवर पुन्हा पाठवू देखील शकतात. याचबरोबर घर, दुकान, ऑफिस आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेजला देखील वीज देऊ शकतात.

(Source)

हयाशी सांगतात की, सर्वात प्रथम मेडिकल प्रोफेशनशी संबंधित लोकांनी बॅकअप बॅटरीज उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिली होता. त्यानंतर निसानने या टेक्नोलॉजीवर काम करण्यास सुरूवात केली. वी2एक्स टेक्नोलॉजीद्वारे या कारची 62 kWh बॅटरी पुर्ण चार्ज होते व ही बॅटरी एका जापानी घराला 4 दिवस वीज पुरवठा करू शकते. याचबरोबर 6200 स्मार्टफोन आणि 43 मजली इमारतीच्या 100 एलीवेटरला वीज देऊ शकते.

(Source)

कंपनीने जापानच्या अनेक नगरपालिकांशी करार करून निसान लीफ त्यांची अधिकृत कार बनवली आहे. निसान लीफमध्ये 40 kWh लीफ प्लसमध्ये 62 kWh बॅटरी येते जी सिंगल चार्जमध्ये 400 किमी चालू शकते. तर नॉर्मल चार्जिंगमध्ये 8 ते 16 तास लागू शकतात. फास्ट चार्जिंगमध्ये केवळ 40 मिनटात 80 टक्के चार्ज होऊ शकते. सेकेंड जनरेशन निसान लीफची किंमत 30 ते 35 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment