वयोवृद्ध मोलकरणीच्या मदतीसाठी हे एमबीए दाम्पत्य रस्त्यावर विकते जेवण

मुंबईच्या कांदिवली स्टेशनवर एका छोट्याशा स्टॉलवर सकाळी 4 वाजल्यापासून नाश्ता मिळण्यास सुरूवात होते. याठिकाणी पोहे, उपमा, इडली, पराठे असे बरेच काही मिळते. चांगल्या कुटुंबातून येणारे हे दोघे नवरा-बायको दररोज 6 तास येथे जेवण विकत असतात. 10 वाजले की, सर्वकाही जमा करून आपआपल्या ऑफिसला निघून जातात. हे कपल हे सर्व आपल्या घरी काम करणाऱ्या वृध्द आजीला खर्चासाठी दोन पैसे मिळावे म्हणून करतात. हे दोघेही स्वतःसाठी नाही तर घरी काम करणाऱ्या वृध्द आजीसाठी करतात.

या कपलची सध्या फेसबुकवर जोरदार चर्चा सुरू आहे. युजर्स यांचे भरभरून कौतूक करत आहेत. या दोघांची ही गोष्ट दिपाली भाटिया हिने फेसबुकवर शेअर केली आहे. अश्विनी शिनॉय शाह आणि तिचे पती अंकुश आगम शाह असे या दोघांचे नाव आहे. फेसबुकवर शेअर केल्यापासून या पोस्टला 12 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

https://www.facebook.com/deepali.bhatia.106/posts/3043348652382537

आपल्या पोस्टमध्ये दिपाली लिहिते की, मुंबईच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे थांबण्यासाठी आणि विचार करण्यासाठी देखील वेळ नाही. अशा ठिकाणी हे दोन सुपरहिरोज आहेत. जे स्वतःपेक्षा अधिक दुसऱ्यांचा विचार करतात. दिपाली सांगते की, या दोघांशी तिची भेट 2 ऑक्टोंबरला झाली. दिपालीला भूक लागल्याने ती कांदिवली स्टेशनच्या बाहेर फूड स्टॉल्सवर आली होती.

दिपाली आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिते की, मला हे दोघे सुरूवातीला गुजराती वाटले. मी त्यांच्या स्टॉलवरील जेवण घेतले. मी जेव्हा त्यांना विचारले की, तुम्ही रस्त्यावर जेवण का विकत आहात. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर माझ्यासाठी मानवतेसाठी करण्यात येणारे सर्वात मोठे काम आहे. त्यांचे उत्तर माझ्या ह्रदयाला स्पर्शुन गेले.

दिपालीनुसार, या कपलची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. दोघेही एमबीए झालेले आहेत. त्यांच्या घरी काम करणाऱ्या 55 वर्षीय अम्माची मदत करण्यासाठी अश्विनी आणि अंकुश दोघेही स्टॉल चालवतात. वृध्द अम्माच्या पतीला पॅरालिसिस आहे. अम्मा जे जेवण बनवते, ते हे दोघेही जण येऊन कांदिवली स्टेशनच्या बाहेर विकतात. अश्विनी सांगतात की, आम्ही आमच्या घरी काम करणाऱ्या अम्माची मदत करत आहोत, कारण या वयात त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करायला लागू नये.

Leave a Comment