इंस्टाग्रामने लाँच केले नवीन मेसेजिंग अ‍ॅप

सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्रामने नवीन चॅटिंग अ‍ॅप Threads लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स आपल्या जवळच्या मित्रांशी चॅटिंग करू शकणार आहेत. थ्रेडस अ‍ॅप इंस्टाग्रामच्या क्लोज् फ्रेंड्स फिचरप्रमाणेच कार्य करते. युजर्स या अ‍ॅपमुळे आपल्या फ्रेंडशी कनेक्ट राहतील व आपल्या गोष्टी देखील अ‍ॅपवर शेअर करता येतील.

इंस्टाग्रामने थ्रेडस अ‍ॅपबद्दल म्हटले आहे की, आम्ही अनेक दिवसांपासून अशा फिचर्सवर काम करत आहोत, ज्याच्या मदतीने युजर्स सहज सोशल मीडियावर महत्त्वाचे अनुभव शेअर करू शकेल. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स आपल्या जवळच्या मित्रांना व्हिडीओ आणि फोटो शेअर करू शकणार आहेत. हे अ‍ॅप स्नॅपचॅटला टक्कर देईल.

या अ‍ॅपमध्ये युजर्सला स्नॅपचॅटप्रमाणेच फिचर्स मिळतील. युजर्सकडून शेअर करण्यात आलेले मेसेज आणि फोटो काहीवेळानंतर आपोआप गायब होतील. इंस्टाग्रामने या अ‍ॅपमध्ये ऑटो स्टेट्स फिचर देखील दिले आहे. तसेच हे अ‍ॅप युजर्सच्या फोनचे लोकेशन, टाइम, बॅटरी आणि नेटवर्कचा देखील वापर करेल.

Leave a Comment