व्हायरल, ‘बुट खरेदी करण्यासही पैसे नव्हते’; हिमा दासने शेअर केले अनुभव

आसामच्या एका छोट्याशा गावापासून ते ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेम्सपर्यंतचा धावपटू हिमा दासचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सुरूवातीच्या काळात हिमा दासला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चांगले बुट घेण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे नव्हते. मात्र आज हिमा दासचा प्रवास भारतातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रसिध्द फेसबुक पेज ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’वर हिमा दासने आपले अनुभव शेअर केले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

हिमा सांगते, माझे आई-बाबा दोघेही तांदळाची शेती करतात. आम्ही संयुक्त कुटुंबात राहतो. आमच्याकडे कधीच जास्त पैसे नसायचे. त्याही परिस्थितीमध्ये माझे आई-वडिल सांगायचे की, आपल्याकडे जे काही आहे, त्यातच आपण सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे.

(Source)

आपल्या या पोस्टमध्ये हिमा सांगते, तिच्या आई-वडिलांना कॉमनवेल्थ गेम्स काय असतात ते देखील माहित नव्हते. मात्र 2018 ला क्वॉलिफाय झाल्यानंतर मला टिव्हीवर बघून ते उत्साही आणि आनंदी होते.

शाळेत असताना फुटबॉल प्रॅक्टिस करण्यासाठी तिच्याकडे चांगली बुट देखील नव्हती. मात्र तिचे शारिरिक शिक्षणाचे सर तिचा स्पीड बघून खूपच प्रभावित झाले. त्यांनी तिला आंतर-जिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. ती स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्यासाठी अनेक दरवाजे उघडले, असे हिमा सांगते.

(Source)

हिमा पुढे म्हणते की, ती स्पर्धा जिंकल्यानंतर माझ्यातील क्षमता बघून दोन प्रशिक्षकांनी मला आसाममधील कॅम्पमध्ये येण्यास सांगितले. मात्र घरच्यांना सोडून कसे जायची याची चिंता सतावत होती. मात्र तिच्या वडिलांनी तिला त्या कॅम्पमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले.

(Source)

आपल्या कॅम्पमधील कडक दिनचर्येबद्दल हिमा सांगते की, तेथे सुर्योदयापुर्वी उठावे लागत असे व दिवसातून दोनदा ट्रेनिंग घ्यावी लागे. तीच सर्व मेहनत आशिया युथ चॅम्पियनशीपमध्ये क्वालिफाईड होण्यास कामाला आली. त्या स्पर्धेत मी 7 वी आली. त्यानंतर वर्ल्ड युथ चॅम्पियनशीपमध्ये 5 वी आले.  त्यानंतर आशियाई खेळांमध्ये आणि आयएएएफ वर्ल्ड अंडर20 चॅम्पियनशीप स्पर्धेत मला भारताचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवणारी मी पहिली भारतीय धावपटू होते.

(Source)

हिमा म्हणते, आज लाखो लोक मला सांगतात की, त्यांना माझ्यामुळे खूप अभिमान वाटतो. मला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. भारतासाठी मी अनेक पदके देखील जिंकली.

“Both my mom and dad were rice farmers, with dreams they couldn’t pursue and conditions that held them back. We lived in…

Posted by Humans of Bombay on Thursday, October 3, 2019

ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजवर हिमाची स्टोरी पोस्ट केल्यानंतर व्हायरल झाली असून, आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक युजर्सनी ही पोस्ट लाईक केली आहे. अनेक युजर्सनी ती खरंच ‘एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व’ असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment