53 किमी उलटे धावत या तरूणींनी रचला विश्वविक्रम

गुजरातच्या बारडोली येथे राहणाऱ्या दोन तरूणींनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने केलेल्या कारनामामुळे विश्वविक्रम बनला आहे. या दोन तरूणींनी 13 तासांमध्ये 53 किलोमीटर उलटे धावत एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. हा विक्रम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या तरूणी आहेत.

ट्विंकल ठाकूर आणि स्वाती ठाकूर या दोघींनी टी-शर्ट आणि ट्रॅक पँट्समध्ये हा विक्रम केला आहे. पंतप्रधान मोदींपासून प्रेरित होत या दोघींनी हा इतिहास रचला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अन्य महिला व तरूणींनी देखील महिला सशक्तीकरणच्या क्षेत्रामध्ये पुढे येऊन आपले टँलेंट दाखवले पाहिजे.

या दोन्ही तरूणींनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता उलटे चालण्यास सुरूवात केली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दांडी येथे पोहचून हा प्रवास संपवला. दोघीही काहीतरी वेगळे करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी आपल्या या धावण्याचे फुटेज गिनीज बुककडे पाठवले व त्यांची निवड झाली.

ट्विंकलने सांगितले की, सुरूवातीला मला वाटले की, मी हे पुर्ण करू शकणार नाही. मात्र आमच्या कुटुंबाने आमचा उत्साह वाढवला. आमचे लक्ष्य आहे की, इतर महिलांना देखील प्रेरित करून,  पुढे येत जगाला आपले टॅलेंट दाखवावे. प्रत्येक महिलेकडे कोणतेना कोणते टँलेंट असते.

स्वातीने देखील आपले अनुभव शेअर करताना सांगितले की, जेव्हा पंतप्रधान मोदींनी महिला सशक्तीकरणाबद्दल सांगितले, तेव्हाच मी हा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत की लक्ष्मी कँपेन अंतर्गत सोशल मीडियावर पोस्ट करण्याची आवाहन केले होती.

Leave a Comment