गुगलने मॅप्ससाठी आणले खास फिचर

गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गुगलने अखेर मॅप्स अॅपसाठी इंकॉग्निटो मोड आणले आहे. गुगलने याआधी युट्यूब आणि वॉइस अस्टिटेंटसाठी इकॉग्निटो फिचर आणले होते. यामुळे युजर्सला आधीपेक्षा अधिक प्रायवेसी मिळेल.

जेव्हाही एखाद्या अॅपचा वापर इंकॉग्निटो मोडवर केला जातो तेव्हा हिस्ट्री रेकॉर्ड होत नाही आणि कोणी तुम्हाला ट्रॅक देखील करू शकत नाही. तसेच तुम्ही जे काही सर्च करता, त्याचा डाटा देखील सेल होत नाही.

इंकॉग्निटो मोडबरोबरच गुगलने व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅप युट्यूबवर देखील ऑटो डिलीट ऑप्शनचा दिला आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स डाटा डिलीट करण्यासाठी वेळ सेट करू शकतात. सेट केलेल्या वेळेनंतर डाटा आपोआप डिलीट होतो.

तसेच, गुगल लवकरच वॉईस असिस्टेंटमध्ये देखील डिलीट फिचर आणणार आहे. त्यानंतर तुम्ही असिस्टेंटवर  Hey Google, delete the last thing I said to you असे म्हणत डाटा डिलीट करू शकाल.

 

 

Leave a Comment