ऑटो एक्सपोमध्ये सादर होणार क्रेटाचे नवीन व्हर्जन

ह्युंडाईची सर्वाधिक विक्री झालेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही क्रेटा लवकरच सेंकेंड जनरेशनमध्ये सादर केली जाणार आहे. कंपनीकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे की, फेब्रुवारी 2020 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये नवीन जनरेशन एसयुव्हीवरील पडदा हटवला जाईल. ही एसयुव्ही मार्च 2020 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. विक्री आण प्रसिध्दीमध्ये ही एसयुव्ही सध्या विक्री होत असलेल्या कारला मागे सोडेल अशी आशा आहे.

(Source)

नवीन जनरेशन ह्युंडाई क्रेटामध्ये किआ सेल्टोसला असलेलेच इंजिन देण्यात येणार आहे. याशिवाय 1.5 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन सोबत 1.4 लिटर टर्बो GDI पेट्रोल देईल, ज्या 7-स्पीड DCT गियरबॉक्स असेल. 2020 क्रेटामध्ये लावण्यात येणारे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्वर्टरमध्ये उपलब्ध असतील. नवीन क्रेटामध्ये साइड इंपॅक्ट प्रोटेक्शन, ड्युअल एयरबॅग्स, एबीएस आणि ईबीडी दिले जाऊ शकते.

(Source)

नवीन जनरेशन ह्युंडाईमध्ये 10.4-इंच इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात येण्याची शक्यता आहे. या इंफोटेनमेंट सिस्टममध्ये ह्युंडाईचे ब्लू लिंक कनेक्टेड टेक्निक आणि टेलिमेटिक्स सॉल्यूशन देखील असेल. कारमध्ये ई-सिमच्या मदतीने इंटरनेट सुविधा देखील मोफत दिली जाईल. नवीन क्रेटाच्या कॅबिनवर डॅशबोर्डला अॅपल कारप्ले आणि अँड्राइड ऑटो कनेक्टिविटी देखील असेल.

Leave a Comment