संशोधकांनी लावला गडप झालेल्या 8 व्या खंडाचा शोध

संशोधकांनी भूमध्य सागरात गडप झालेल्या एका खंडाचा शोध लावला आहे. ग्रीनलँडच्या आकाराच्या या खंडाचे नाव ग्रेटर एड्रिया आहे. जो उत्तर आफ्रिकेपासून जवळपास 14 कोटी वर्षांपुर्वी वेगळा होऊन भूमध्य समुद्रात बुडाला होता. गोंडवाना रिसर्च जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

उट्रेख्त युनिवर्सिटीचे प्रोफेसर डेव वॅन हिंसबर्गन यांनी सांगितले की, या खंडाबद्दल काहीही माहिती न घेता दरवर्षी मोठ्या संख्येने लोक सुट्ट्यांमध्ये येथे येतात. संशोधनामध्ये असे दिसले की, अधिकतर पर्वत शृखंला या एकाच  खंडातून उत्पन्न झालेल्या आहेत. या पर्वत शृखंला 20 कोटी वर्षांपुर्वी उत्तर आफ्रिकेपासून वेगळ्या झाल्या होत्या.

या खंडाचा एकमेव वाचलेला भाग हा एक स्ट्रिप (पट्टी) आहे, जो इटलीच्या ट्युरिन शहरापासून जात एड्रियाटिक समुद्रापर्यंत पोहचतो. या भागाला भूवैज्ञानिकांद्वारे एड्रिया म्हटले जाते. त्यामुळे संशोधकांनी या खंडाला ग्रेटर एड्रिया असे नाव दिले आहे.

(Source)

भूमध्य सागरीय क्षेत्रातील भू वैज्ञानिकांचे प्लेट टेक्टोनिक्सबद्दल वेगवेगळे विचार आहेत. प्लेट टेक्टोनिक्स असा सिध्दांत आहे, ज्याद्वारे समजते की, महासागर, खंड आणि पृथ्वीच्या इतर भागांचे निर्माण कसे झाले.

संशोधकांनुसार, ग्रेट एड्रियाचा बहुतांश भाग हा पाण्याच्या खाली होता. येथे हळूहळू पर्वत शृंखलांची निर्मिती झाली. यातूनच आल्प्स, एपिनेन्स, बाल्कन, ग्रीस आणि तुर्कीच्या पर्वतांची निर्मिती झाली.

याआधी जानेवारी 2017 मध्ये संशोधकांनी सुपरकॉन्टिनेंट गोंडवाना वेगळ्या झालेल्या एका खंडाचा शोध लावला होता. जानेवरी 2017 मध्येच दुसऱ्या संशोधकांनी प्रशांत महासागरात ड्रिलिंगद्वारे जिलँडियाच्या गायब झालेल्या खंडाचा शोध लावला होता.

 

Leave a Comment