इंधनावरील सबसीडी बंद करताच या ठिकाणी सुरू झाल्या दंगली

इक्वाडोरचे सरकार सध्या देशामध्ये आर्थिक सुधारणा करत आहे. वित्तीय धोरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने 2 बिलियन डॉलर्सची घोषणा केली आहे. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेली इंधनावरील सबसीडी समाप्त झाली आहे.

इंधनावरील सबसीडी हटवताच देशामध्ये दंगली सुरू झाल्या आहेत. दोन बिलियन डॉलरच्या वित्तीय सुधारणा पॅकेजमुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. देशातील विविध भागात लोक रस्त्यावर उतरलीत व तोडफोड करत आहेत.

(Source)

 

प्रदर्शन करणाऱ्यांनी रस्त्यावर टायर झाळले आहेत, पोलिसांवर दगडफेक केली आहे. परिस्थिती एवढी बिघडली आहे की, राष्ट्रपती लेनिन मोरेनो यांना आणीबाणीची घोषणा करावी लागली आहे.

इंधनातील सबसीडी समाप्त केल्यानंतर वाहनचालकांनी राजधानी क्विटो आणि गुयाकिल शहरात चक्काजाम करत विरोध प्रदर्शन केले. विद्यार्थी आणि युवक देखील रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा असे निदर्शन करणारे म्हणत आहेत.

(Source)

क्विटोमध्ये निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की, पोलिसांनी निदर्शकांवर अश्रूधुराचा मारा केला. सबसीडी पुन्हा सुरू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे निदर्शक सांगत आहेत.

तसेच, अधिकाऱ्यांनुसार देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सबसीडी बंद करणे चांगले पाऊल आहे. यामुळे इंधनाची तस्करी देखील थांबेल.

 

Leave a Comment