‘आप’ली साथ सोडून शिवबंधनात अडकल्या दीपाली सय्यद


मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे फार वेगाने वाहू लागले आहेत. त्यातच आता आम आदमी पक्षाच्या सदस्य असलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांची देखील भर पडली आहे. गुरूवारी अभिनेत्री सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मुंब्रा मतदारसंघातून त्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक सुद्धा लढवणार आहेत.

दीपाली यांनी गुरूवारी रात्री उशिरा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्या मुंब्रा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. याबरोबरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना सेनेकडून हिरवा कंदील दाखवला आहे. आज (शुक्रवारी) त्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

Leave a Comment