87 कोटींमध्ये विकले गेले ब्रिटिश संसदेचे हे खास पेटिंग

ब्रिटिश कलाकार बैंस्कीच्या एका पेटिंगची 87 कोटींमध्ये विक्री झाली आहे. या पेटिंगमध्ये ब्रिटिश संसदेत खासदारांच्या ऐवजी चिंपाजींना बसलेले दाखवण्यात आलेले आहे. ही पेटिंग 2009 मध्ये बनवण्यात आली होती. 3 ऑक्टोंबरला या पेटिंगचा लिलाव करण्यात आला असून, लिलावात या पेंटिगला 15 कोटींपर्यंत बोली लागण्याची शक्यता होती. मात्र 13 मिनिटे चाललेल्या बोलीत अखेर 12 मिलियन डॉलर (जवळपास 85 कोटी) ना पेटिंगची विक्री झाली.

या पेटिंगच्या विक्रीनंतर देखील कलाकार बैंस्की खुश नाही. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, बैंस्कीच्या पेटिंगला रेकॉर्ड किंमत मिळाली, मात्र लाजीरवाणी गोष्ट म्हणजे मी याचा मालक नाही.

या पेटिंगची उंची 13 फूट असून, या ऑईल पेटिंगमध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चिंपाजी ग्रीन बेंचवर बसलेले दाखवण्यात आलेले आहेत. ही पेटिंग बनवणाऱ्या कलाकाराने अद्याप आपली ओळख जाहीर केलेली नाही. या पेटिंगचे नाव ‘विकसित संसद’ असे आहे. बैंस्की एक स्ट्रीट आर्टिस्ट असून, तो अशाच प्रकाच्या राजकीय भाष्य करणारी चित्र काढतो.

2008 मध्ये न्युयॉर्क येथे झालेल्या लिलावात बैंस्कीच्या आर्टवर्कसाठी 1.87 मिलियन डॉलर्सची बोली लागली होती.

 

Leave a Comment