योगाविषयीचे गैरसमज

yoga
सध्याच्या काळात अनेक लोक वजन कमी करण्यासाठी योगासने करतात. योगासने करण्यात चूक काही नाही, परंतु योगासने सुरू करण्यापूर्वी किंवा योगोपचार घेण्यापूर्वी आपल्या मनातले योगाविषयीचे काही गैरसमज दूर करण्याची गरज आहे. पहिला गैरसमज म्हणजे केवळ योगासने केली म्हणजे योगोपचार झाला असे म्हणता येत नाही. योगाच्या बरोबरच आहार आणि वर्तणूक, त्याचबरोबर जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन याही गोष्टी महत्वाच्या असतात. यालाच आहार-विहार असे म्हणतात. आहार-विहाराचे योगशास्त्रातले नियम न पाळताच केवळ योगासने करत गेलोे तर योगाचे फायदे होणार नाहीत.

योगाची माहिती पुस्तकातून किंवा काही भित्तीपत्रकातून मिळते असा एक समज लोकांमध्ये आहे. मात्र चांगल्या योग शिक्षकाशिवाय योगोपचार करता कामा नयेत. योग शिक्षक आपल्याला योगोपचाराबरोबरच धर्म, ऐश्‍वर्य, वैराग्य आणि ज्ञान यांचीही माहिती देत असतात. योगाविषयीचा आणखी एक गैरसमज म्हणजे योगामुळे अद्भूत शक्ती प्राप्त होते किंवा गूढ ज्ञान होते. योगामुळे असे काहीही होत नसते. योगोपचारामुळे चांगली स्मरणशक्ती, एकाग्रता, तंदुरुस्त शरीर आणि विचाराची गतीमान प्रक्रिया या गोष्टी मात्र नक्कीच प्राप्त होत असतात.

योगासने करताना कपडे कोणते घालावेत याबाबतीत खूप गैरसमज आहेत. मात्र हे सारे गैरसमज दूर केले पाहिजेत आणि हवामानाला योग्य होतील असे सैल कपडे घालून योगासने केली पाहिजेत. ते कोणत्या रंगाचे असावेत याला काहीही महत्व नाही. योगासने म्हणजे शरीराला कमालीचा ताण देण्याचा व्यायाम नव्हे किंवा शरीराला दु:ख देण्याचा सुद्धा व्यायाम नव्हे. आवश्यक तो ताण आणि नंतर तो ताण शिथील करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे. शरीराच्या क्षमतेच्या पलीकडे ताण शरीराला देता कामा नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment