पालकाचा रस प्या, सडपातळ व्हा

speenach
लंडन : पालकाच्या भाजीचा रस वजन कमी करण्यास आणि जाडी रोखण्यास उपयोगी पडू शकतो, असे स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून दिसून आले आहे. या रसामुळे वजन वाढविणारे अनारोग्यकारक अन्न पदार्थांविषयी नावड निर्माण होते. त्याचबरोबर या रसामुळे वजन उतरण्याचा वेग वाढतो. स्वीडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ स्वीडन या विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

लठ्ठ व्यक्तीला सतत काही तरी खावेसे वाटते आणि त्यातल्या त्यात आरोग्याला उपयुक्त नसलेला पण वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारा आहार घेण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. मात्र रोज पालकाचा रस पिणारी व्यक्ती अनारोग्यकारक अन्न पदार्थ टाळू शकते आणि ९५ टक्के इतकी त्याची ही प्रवृत्ती वाढते. माणसाचे वजन वाढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आतल्या आत वजन कमी करण्याची एक प्रक्रिया जारी असते. ती वजन कमी करण्याची प्रक्रिया पालकाच्या रसामुळे ४३ टक्क्याने वाढते.

हा सारा परिणाम पालकाच्या भाजीतील थायलाकॉईडस्मुळे घडतो. म्हणजे अनावश्यक भूक लागण्याची शरीरातली विकृती कमी होते. स्वीडनमध्ये ३८ लठ्ठ महिला आणि पुरुष यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला. त्यांना ब्रेक फास्टच्या आधी एक ग्लास भरून पालकाचा रस पाजण्यात आला, तेव्हा त्यांची खाण्याविषयीची हाव कमी झालेली दिसली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment