दुधाने अस्थिभंगाचा धोका

milk
दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांना कधीही फ्रॅक्चर होण्याचा धोका नसतो असा सर्वसाधारण समज असला तरी प्रत्यक्षात तज्ज्ञांच्या निरीक्षणात हा समज खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुधाचे प्राशन जेवढे जास्त होईल तेवढा अस्थिभंग होण्याचा धोका जास्त असतो असे काही तज्ज्ञांच्या पाहणीत आढळून आले आहे. दुधातील लॅक्टोज आणि गॅलॅक्टोजच्या अधिक प्रमाणामुळे हे घडत असावे असा त्यांचा अंदाज आहे. अर्थात तज्ज्ञांची ही निरीक्षणे प्राण्यावर करण्यात आलेल्या प्रयोगांवरून निघाली आहे.

स्वीडनमधील प्रा. कार्ल मायकल्सन् या तज्ज्ञाच्या नेतृत्वाखाली एका संशोधकांच्या गटाने केलेल्या प्रयोगातून या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. स्वीडनमध्ये विविध वयोगटांच्या स्त्री-पुरुषांचीही निरीक्षणे नोंदण्यात आली. या निरीक्षणासाठी सुमारे ६१ हजार लोकांची निवड करण्यात आली होती. १९८७ पासून १९९७ पर्यंत त्यांचा आहार, त्यातील दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण यांच्या नोंदी करण्यात आल्या.

या कालावधीत १५ हजार लोक घरातच घसरून पडून हाडाला फ्रॅक्चर होऊन मरण पावले. त्यातल्या ४ हजार लोकांना मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले होते. या लोकांच्या आहारामध्ये दुधाचे प्रमाण चांगले असून सुद्धा त्यांच्यामध्ये ही प्रवृत्ती दिसून आली. याचा अर्थ हे लोक दुधाचे प्राशन करीत असूनही फ्रॅक्चरला बळी पडले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment