डोके खाजण्यावर घरगुती उपाय

head-icht
काही लोकांना डोके खाजविण्याची सवय असते. चार चौघात गप्पा मारायला बसले की, डोके खाजायला लागते. आता सर्वांसमोर डोके खाजवणे चांगले दिसत नाही. त्यामुळे डोके खाजविणे टाळण्याकडे प्रवृत्ती असते. पण खाज नावाची गोष्ट फार वाईट असते. ती थांबवता येत नाही. नकळतपणे डोक्याकडे हात जातो आणि आपले इंप्रेशन डाऊन होते. यावर काय करावे हा प्रश्‍न सर्वांनाच सतावतो. काही लोक आपल्या मनानेच निरनिराळे शांपू वापरून आणि ते वारंवार बदलून हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण काही उपाय होत नाही. त्यावर काही घरगुती उपाय आहेत.

काही वनस्पतींपासून बनविलेले लेप डोक्याला लावणे हा एक उपाय आहे. त्यामध्ये केळी आणि मध कालवून त्याचा लेप डोक्याला लावण्याचा एक उपाय समाविष्ट आहे. तो डोक्यावर थोडा वेळ लावून डोके शांपूने धुवून टाकावे. मध लावण्याचीही सूचना काही लोक करत असतात.

काही लोक खोबरेल तेल गरम करून डोक्याला लावण्याची शिफारस करतात. अशा प्रकारच्या गरम तेलाचा उपाय करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरावे असे काही तज्ज्ञांची सूचना असते. हे तेल गरम करावे आणि गरम असतानाच डोक्याला चोळावे. ते लावताना त्यात मधाचा एक थेंब टाकावा आणि या तेलाने हळू हळू मसाज करावा. नंतर शांपूने केस धुवावेत. लिंबू वापरून सुद्धा असा लेप तयार करता येतो. लिंबाचा रस डोक्याला लावला जातो. ऍलोवेरा म्हणजे कोरफड हे सुद्धा केसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment