कंपवात नियंत्रणात आणता येतो

shake
कंपवात हा मेंदूचा विकार आहे. शरीराच्या हालचालींवरचा मेंदूचा ताबा कमी झाला की, कंपवात निर्माण होतो. कंपवात दुरुस्त होत नाही. परंतु जीवन पद्धतीतील बदल, तणावाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक जीवनातील सहभाग या माध्यमातून कंपवात नियंत्रणात ठेवता येतो. अशा सहभागातून मेंदूला चालना मिळते आणि त्यातून हा विकार नियंत्रणात राहतो.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमधील मज्जा संस्थेवर काम करणार्‍या डॉ. मंजरी त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. अल्झायमर्स ऍन्ड रिलेटेड डिस्ऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात त्या बोलत होत्या. नेदरलँडस्मध्ये कार्यरत असलेल्या अशाच प्रकारच्या संस्थेच्या मदतीने डॉ. मंजरी त्रिपाठी यांनी काही संशोधन केलेले आहे आणि आपल्या संशोधनाचा अहवाल लवकरच सादर करण्याची त्यांची तयारी आहे.

वारंवार होणारे आरोग्य तपासणी आणि शरीराला सक्रिय ठेवणे याबरोबरच मद्यपान आणि धूम्रपान टाळणे हे कंपवातासाठी आवश्यक असते, असेही त्या म्हणाल्या. या विकारात स्मरणशक्ती नष्ट होते. जगात दर चार सेकंदाला एक व्यक्ती या विकाराला बळी पडत असते. २०४० साली जगात या विकाराने त्रस्त असणार्‍यांची संख्या ८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे, असाही इशारा डॉ. त्रिपाठी यांनी दिला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment