कोण आहेत बीसीसीआयचे प्रमुख अधिकारी ज्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना घेतले फैलावर?


नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये परस्पर हितसंबंधांवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यात भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणारी कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमान गायकवाड यांच्या समितीला आता नोटीस पाठवण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर, द्रविड आणि लक्ष्मणही याच नियमाचे याआधी शिकार झाले होते. दरम्यान बीसीसीआयचे प्रमुख अधिकारी संजीव गुप्ता यांच्याकडे या दिग्गज खेळाडूंना नोटीस पाठवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे कोण आहेत हे संजीव गुप्ता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीसीसीआयच्या कामावर देखरेख करण्याचे काम इंदौरला राहणारे संजीव गुप्ता हे करतात. त्यांनी गेल्या तीन वर्षात बीसीसीआय आणि दिग्गज खेळाडूंना फैलावर घेतले आहे. जवळ जवळ तीन वर्षात दिग्गजांना मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेले 45 वर्षांचे संजीव यांनी 400 ई-मेल पाठवले आहेत.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांना परस्पर हितसंबंधावरून संजीव गुप्ता यांनीच ई-मेल पाठवले होते. त्याचबरोबर त्यांना बीसीसीआयचे प्रत्येक नियम तोंडपाठ आहेत. गुप्ता खेळाडूंना किंवा अधिकाऱ्यांना नोटीस पाठवताना आपल्या ई-मेलमध्ये नियमांचा स्पष्ट उल्लेख करतात. त्यामुळे त्यांच्या कामावर आतापर्यंत एकदाही शंका घेण्यात आलेली नाही. फक्त लोढा समितीच्या नियमांचे 100% पालन करावे एवढाच त्यांचा उद्देश असतो.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाला नवे प्रशिक्षक निवडूण देणाऱ्या समितीला संजीव गुप्ता यांनी नोटीस पाठवली होती. कपिल देव यांच्यावरही यात परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप करण्यात आला आहे. कपिल देव यांनी या आरोपाअंती आपल्या या पदाचा राजीनामा सोपावला आहे. याचबरोबर शांता रंगास्वामी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याच समितीने रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड केली होती.

Leave a Comment