आजचा गोडसे गांधींचा भारत नष्ट करीत आहे, देश वाचवा – ओवेसी


औरंगाबाद – अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचे गोडसे हे गांधींचा भारत नष्ट करीत असल्याचे त्यांनी कुणाचेही नाव न घेता ते म्हटले.

बुधवारी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मोर्चाला संबोधित करतांना ओवेसी म्हणाले की, गोडसेने गांधींची हत्या केली होती पण सध्याचे गोडसे गांधींचा भारत नष्ट करीत आहेत. गांधींवर विश्वास असणार्‍यांना मी प्रेमळ देश वाचवायला सांगतो.

ओवेसी यांच्या याच मेळाव्यात तिकिटाबाबत गोंधळ उडाला होता. वास्तविक जावेद कुरेशी यांना तिकीट न दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. कुरेशी यांना औरंगाबाद मध्यवर्ती मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती पण पक्षाने त्यांना या विधानसभा जागेवरुन तिकीट दिले नाही. ओवेसी जनतेला संबोधित करीत असताना पक्ष समर्थक घोषणाबाजी करू लागले.

Leave a Comment