हजारो पत्नी पीडित पतींचे या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन

पत्नीला त्रास दिल्यावर त्यासाठी पोलिस, महिला आयोग, न्यायालयबरोबर अनेक संस्था आहेत. मात्र पतींना त्रास देणाऱ्या आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवल्यावर अशा पतींसाठी कोणताही पुरूष आयोग नाही. याच मागणीसाठी बुधवारी देशभरातून आलेल्या हजारो पीडित पतींनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर प्रदर्शन केले. त्यांनी सरकारकडे पीडित पुरूषांसाठी पुरूष आयोग बनवण्याची मागणी केली आहे.

अनेक पीडित पुरूषांनी सांगितले की, कुटुंबामध्ये माहेरच्यांकडच्या लोकांचा हस्तक्षेप बंद होणे गरजेचे आहे. 80 टक्के प्रकरणात लग्न तुटण्यास माहेरच्यांकडच्या लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत असतो.

बंगळुरूमधील आयटी कंपनीत सेल्स मॅनेजर मनप्रीत सिंह भंडारी यांनी सांगितले की, 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. मात्र काही दिवसांमध्येच कौटुंबिक भांडणे होण्यास सुरूवात झाली. भांडणे एवढी वाढली की, लग्न टिकूच शकत नाही. आता पत्नी न सांगता 15 महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी गेली आहे. तसेच पत्नीने आईच्या सांगण्यावरून अनेक खोट्या तक्रारी देखील दाखल केल्या आहेत.

अशाच प्रकारची कारणे अनेक पीडित पतींनी सांगितली.

Leave a Comment