ही गायिका एका दिवसात कमावते ३.६२ कोटी रुपये


वॉशिंग्टन – गायनात सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांची यादी फोर्ब्ज मासिकाने जाहीर केली आहे. यात अमेरिकी पॉप सिंगर टेलर स्विफ्ट अव्वल स्थानी आहे. फोर्ब्जनुसार, ‘हायेस्ट पेड सेलिब्रिटी’ टेलरची वार्षिक कमाई १८५ मिलियन डॉलर (सुमारे १३२२ कोटी रुपये) एवढी आहे. तिचे एक दिवसाचे उत्पन्न ५.६ लाख डॉलर (सुमारे ३.६२ कोटी रुपये) एवढे आहे.

याच यादीत बियान्से दुसऱ्या व रिहाना तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे फोर्ब्जने जुलै महिन्यात ग्लोबल सेलेब्जची यादी जाहीर केली होती. स्विफ्ट त्यातही पहिल्या क्रमांकावर होती. फक्त दोन महिलांना या यादीत स्थान मिळाले होते. यात टेलर स्विफ्टनंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकी रिअल स्टार व मॉडेल काइली जेनरचे नाव होते.

याबाबतच्या वृत्तानुसार, स्विफ्टकडे ६०० कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता आहेत. चार वेगवेगळ्या देशात तिच्या ८ पेक्षा जास्त मालमत्ताही आहेत. आपल्या कमाईतील सर्वाधिक भाग टेलरने रिअल इस्टेटमध्ये गुंतवला आहे.

Leave a Comment