एवढ्या संपत्तीचे मालक आहेत शिवसेनेचे युवराज


मुंबई – वरळी विधानसभा मतदारसंघातून गुरूवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले होते. आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपली एकूण संपत्ती जाहीर केली आहे. आपली एकूण संपत्ती ही १६ कोटींहून अधिक असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच्या संपत्तीची माहिती जाहीर करणे हे अनिवार्य असते. संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर २० लाख ४९ हजारांचे बाँड शेअर, ६४ लाख ६५ हजारांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू, ६ लाख ५० हजारांची कार असल्याचे नमूद केले आहे. तर ४ .६७ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रकात म्हटले आहे यात घोडबंदरमध्ये दोन दुकाने आणि खालापूरमध्ये चार प्लॉट असल्याचेही नमूद केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. आदित्य यांच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील पहिलाच सदस्य यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. पण त्यांनी मला पदात रस नाही, मी समाजासाठी काम करणार अशी भावना व्यक्त केली.

Leave a Comment