मायक्रोसॉफ्टच्या फोल्डेबल स्मार्टफोनचा फर्स्ट लूक रिलीज

काही दिवसांपुर्वीच सॅमसंगने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. लवकरच मोटोरोला देखील आपला फोल्डेबल स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयार आहे.

(Source)

फोल्डिंग स्मार्टफोनची क्रेझ पाहता मायक्रोसॉफ्ट कंपनीने देखील आपला फोल्डिंग स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने आपला पहिला फोल्डेबल फोन सरफेस ड्युओ (Surface Duo) समोर आणला आहे. कंपनीने सध्या या फोनची केवळ झलक दाखवली असून, पुढील एक वर्षांच्या आत या फोनची विक्री सुरू होईल.

(Source)

मायक्रोसॉफ्टचा सर्फेस ड्युओ या स्मार्टफोनमध्ये 5.6 इंचचे दोन स्क्रीन आहेत. जे एखाद्या पुस्तकाप्रमाणे फोल्ड करता येते.

सरफेस ड्युओ हा मायक्रोसॉफ्टचा पहिला अँड्राइड पावर्ड स्मार्टफोन असेल, तसेच हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रँगन 855 वर कार्य करेल. हा फोन टॅबलेटप्रमाणे देखील वापरता येईल. ख्रिस्मस 2020 ला हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप फोनच्या किंमतीबद्दल काहीही माहिती दिलेली नाही.

 

Leave a Comment