या टिकटॉक स्टार आहेत भाजपच्या विधानसभेच्या उमेदवार

लोकांमध्ये व्हिडीओ शेअरिंग अॅप टिकटॉकची एवढी क्रेज आहे की, आता तर भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे त्या देखील टिकटॉक स्टार आहेत. उमेदवारी दिल्यानंतर या उमेदवाराच्या फॉलोवर्समध्ये आणखीन वाढ झाली आहे.

(Source)

हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट आधीपासूनच टिकटॉक स्टार आहेत.  आधीपासूनच प्रसिध्द अभिनेत्री आहेत. सोनाली फोगाट या टिकटॉकवर सक्रिय असतात. सोनाली यांना भाजपने आदमपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तिकिट मिळाल्यानंतर लोक त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत.

(Source)

हरियाणामध्ये सोनाली फोगाट यांना तिकीट मिळणे राजकीय विषय ठरला आहे. तिकीट मिळाल्यामुळे त्यांच्या फोलोवर्सच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे.

(Source)

सोनाली यांनी करिअरची सुरूवात टिव्ही अँकर म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी एक्टिंग क्षेत्रात देखील काम केले. त्या चित्रपटात आणि काही टिव्ही सिरियल्समध्ये देखील दिसल्या आहेत.

हरियाणातील भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असलेल्या सोनाली फोगाट यांचे लग्न झालेले आहे. मात्र त्यांचा पतीचा रहस्यमयी रित्या मृत्यू झालेला आहे. सोनाली मागील 7-8 वर्षांपासून भाजपमध्ये असून, त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या नॅशनल वर्किंग कमेटीच्या सदस्या देखील आहेत.

Leave a Comment