वाहनांवर पक्षांचे चिन्ह, मालकांवर दाखल होणार आचारसंहितेचे गुन्हे


मुंबई – राज्यातील राजकीय हालचालींना विधानसभा निवडणुका जाहीर होताच वेग आला आहे. प्रत्येकाचीच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घाई सुरु आहे. उमेदवारांना आचारसंहिता लागू असल्यामुळे निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे. पक्षांच्या समर्थकांनाही आचारसंहितेच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. आता दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांवर पक्षांचे स्टिकर्स, छायाचित्रे लावलेल्यांवर निवडणूक आयोगाचे भरारी पथक आचारसंहितेचे गुन्हे दाखल करत आहे. आतापर्यंत सोलापूर शहरात सुमारे ८ ते ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परंतु संपूर्ण राज्यात ही कारवाई होताना दिसत नाही. पक्षाचे स्टिकर्स, झेंडे, चिन्हे असलेली वाहने अजूनही वापरली जात असल्याचे दिसत आहे. ही कारवाई मात्र सोलापूर येथे होताना दिसते. पण अशी कारवाई इतर ठिकाणी होत नसल्याचे सांगण्यात येते.

सोलापूर येथील मड्डीवस्ती जवळ मंगळवारी एका वाहनावर विनापरवानगी शिवसेनेचे चिन्हाचे स्टिकर्स लावलेले आढळून आले. संबंधित वाहनाच्या चालकाकडे भरारी पथकाने या बाबत विचारणा केली असता निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. भरारी पथकाच्या अधिकाऱ्याने यावरुन चालक दत्तात्रय मल्लिकार्जुन कुरडे (वय २४ , रा.बी बी दारफळ, ता.दक्षिण सोलापूर) यांच्या विरोधात आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.

Leave a Comment