3 लाखांच्या आत खरेदी करू शकता या कार

फेस्टिव सिझनमध्ये नवीन वस्तू खरेदी करणे शुभ समजले जाते. अनेकजण सणांच्या निमित्ताने नवीन गोष्टी खरेदी करत असतात. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 3 लाख रूपयांच्या जवळ असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच  तीन खास कार्स घेऊन आलो आहोत. या कारबद्दल जाणून घेऊया.

(Source)

रेनॉल्ट क्विड –

काही दिवसांपुर्वीच रेनॉल्टने आपली क्विड कार बाजारात आणली असून, यात अनेक बदल केले आहेत. आधीच्या तुलनेत ही कार अधिक बोल्ड असून, यात नवीन फिचर्स देखील आहेत. इंजिनबद्दल सांगायचे तर यात 800 सीसी इंजिन आहे, जे 54bhp पॉवर आणि 72Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्स आहे. 1 लिटरमध्ये ही कार 25.17 किलोमीटर मायलेज देते. क्विडची दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत 2.83 लाखांपासून सुरू आहे.

(Source)

ऑल्टो –

नवीन ऑल्टो सेंगमेंटची ही पहिली कार आहे, ज्यामध्ये  BS6 इंजिन आहे. यामध्ये एबीएस आणि एअरबॅग सारखे सेफ्टी फिचर्स देखील देण्यात आले असल्याने कारच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामध्ये 800cc इंजिनला BS-6  मध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. हे इंजिन 48PS पॉवर आणि 69Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड गेअर बॉक्स देण्यात आले आहेत. नवीन  BS6 ऑल्टो 1 लिटरमध्ये 22.05 किलोमीटर मायलेज देते. या कारची किंमत 2.93 लाखांपासून सुरू आहे. आपल्या सेगमेंटमधील ही सर्वाधिक विक्री झालेली कार आहे.

(Source)

डॅटसन रेडी-गो –

एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये डॅटसनच्या रेडी –गो ने आपली जागा बनवली आहे. रेडी – गोमध्ये 800 सीसी इंजिन आहे, जे 54bhp पॉवर देते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. एक लीटरमध्ये ही कार 25.17 किलोमीटर मायलेज देते. रेडी गोची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 2.79 लाख रूपयांपासून सुरू आहे. या कारमध्ये जागा देखील भरपूर आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार काही नवीन फिचर्सचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे.

Leave a Comment