राष्ट्रवादीने जाहिर केली ७७ उमेदवारांची पहिली यादी


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली 77 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.

अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, छगन भुजबळ, रोहित पवार यांच्या नावांचा राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत समावेश आहे. पहिल्या यादीत २० विद्यमान आमदारांचा समावेश असून नवीन व तरुण चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

या ७७ जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान १९ विधानसभा आणि १ विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे. शिवाय या यादीत नव्याने प्रवेश केलेले काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने या पहिल्या यादीतच अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप- सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment