या विचित्र अंधश्रध्देवर जगभरातील लोक ठेवतात विश्वास

सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, मांजरीने रस्ता कापला तर अपशकून असतो. एवढेच नाही तर लोक शिंक आली तरी अपशकून समजतात. आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र अपशकूनांबद्दल सांगणार आहोत. हे अपशकून आहेत विचित्र, मात्र जगभरातील लोक यावर विश्वास ठेवतात.

(Source)

युरेशियन रायनेसला जगातील सर्वात वाईट पक्षी समजले जाते. युरोपमध्ये दिसणाऱ्या या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी आपली मान सर्व बाजूंना फिरवू शकतो. मात्र यांच्या बाबतीत असे ही म्हटले जाते की, रायनेस ज्या व्यक्तीकडे मान फिरवतो, त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

(Source)

19 व्या शतकातील फोटो काढणाऱ्या कॅमेऱ्याबद्दल देखील लोकांमध्ये अंधविश्वास आहे. असे समजले जाते की, एखाद्याचा फोटो काढून त्याची आत्मा वश करता येते.

(Source)

अनेक ठिकाणी असा अंधविश्वास आहे की, आरशामध्ये मनुष्याची आत्मा कैद होते. या भितीने अनेक लोक आरशात देखील बघत नाहीत.

(Source)

19 व्या शतकात ओपल स्टोनला वाईट दगड समजले जात असे. या दगडाबद्दल अंधश्रध्दा होती की, हा दगड घातल्याने नशीब खराब होते. मात्र मध्य युगातील लोक हा दगड अपार शक्तींचे प्रतिक असल्याचे मानत असे. असे म्हणतात की, ओपलला ताज्या तमालपत्रात गुंडाळून हातात ठेवल्याने अदृश्य होण्याची शक्ती मिळते.

(Source)

रशियामध्ये चिमणीचे शौच करणे लकी समजले जाते. असे समजले जाते की, जर चिमणीने तुमच्या सामानावर शौच केले तर तुम्ही श्रीमंत बनू शकता.

Leave a Comment