दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला जस्टिन बिबर


पॉप स्टार जस्टिन बिबर सध्या भलताच आनंदात दिसत आहे. सोशल मीडियावर जस्टिनने केलेली पोस्ट पाहता त्याच्या आनंदाचा अंदाज लावणे सहज शक्य होत आहे. कारण तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. मॉडेल हिली बाल्डविनसोबत जस्टिनने पुन्हा एकदा दुसरे लग्न केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर या दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

My bride is 🔥

A post shared by Justin Bieber (@justinbieber) on


एंगेजमेंट अ‍ॅनिव्हर्सरी या दोघांची असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दुसऱ्यांदा झालेल्या लग्नसोहळ्यामध्ये १५४ नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसापासून होत्या. पण या दोघांनी पुन्हा लग्न करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

View this post on Instagram

Looking forward to forever with you @haileybieber

A post shared by Justin Bieber (@justinbieber) on


हिलीने या लग्नामध्ये पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. तर जस्टिन ब्लॅक टक्सीडोमध्ये दिसत होता. हिलीसोबत २०१८ मध्ये जस्टिनने लग्न केले. जस्टिन २०१६ पासून हिलीला डेट करत होता. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ही जोडी लग्न बंधनात अडकली.

Leave a Comment