35 हजार पदे रिक्त, मात्र केवळ कुत्र्यांची होणार भरती

देशाची सुरक्षा वाढवण्यासाठी, सुरक्षा दलाला आधुनिक बनवण्यासाठी आजच्या काळात तीन गोष्टींची गरज आहे. या तीन गोष्टी जर सुरक्षा दल आणि पोलिसांकडे असतील तर दहशतवाद्यांचा सामना करणे सहज सोपे आहे. यामुळे नशेच्या पदार्थांची स्मगलिंग बंद होईल, गुन्ह्याचा तपास त्वरित होईल. या तीन गोष्टी म्हणजे – सुरक्षा आणि देखरेख ठेवण्यासाठी सेटेलाईट, ड्रोन आणि कुत्रे या आहेत. ही माहिती गृह विभागाचे एडिशनल सेक्रेटरी विवेक भारद्वाज यांनी दिल्लीच्या प्रगती मैदानवर आयोजित तीन दिवसीय इंडिया इंटरनॅशनल सिक्युरिटी एक्सपो-2019 मध्ये मांडली.

विवेक भारद्वाज म्हणाले की, या तीन गोष्टींमुळे सुरक्षा दलांना अधिक ताकद मिळेल. कोणत्याही कारवाईच्या आधी यांच्याद्वारे रेकी करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या जवानांचे देखील प्राण वाचतील. सेटेलाइट्सद्वारे दहशतवाद्यांविरोधात लढता येईल. ड्रोनद्वारे देखील लक्ष्य ठेवण्यात येते.

ते म्हणाले की, सुरक्षा दलाला सर्वाधिक गरज आहे ती म्हणजे कुत्र्यांची. आपल्या सुरक्षा दलाकडे 9 टीम आहेत. ज्यामध्ये स्निफर डॉग्स असतात. या कुत्र्यांच्या मदतीने अनेक दहशतवादी हल्ले रोखण्यात आले आहेत. स्पोटके, ड्रग्स शोधण्यात आल्या आहेत. मात्र आजही 35 हजार कुत्र्यांची सैन्यात कमी आहे. यांची लवकरात लवकर भरती होणे गरजेचे आहे. या भरतीमुळे सुरक्षा दलांना अधिक ताकद मिळेल. पोलिसांसाठी देखील एक वेगळे सेटेलाईट असणे आवश्यक आहे.

भारद्वाज म्हणाले की, जास्त मनुष्यबळ नाही तर जास्त टेक्नोलॉजी हवी. आपली पोलिस फोर्स जगातील सर्वात मोठी पोलिस फोर्स आहे. मात्र सुविधा आणि आधुनिक शस्त्रांच्या बाबतीत खूप मागे आहे.

Leave a Comment