वादाच्या भोवऱ्यात सापडला ‘हाऊसफुल ४’


काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल अभिनीत बहुप्रतिक्षित ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण हा विनोदी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गावरील अडचणी वाढताना दिसत आहे. या चित्रपटाभोवती वादाचे वादळ ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेल्या संगीतामुळे फिरत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेले संगीत चोरीचा असल्याचा आरोप काही लोकांनी केला होता. ट्रेलरमधीव पार्श्व संगीत हे स्कोर चिरंजीवी स्टारर ‘कैदी १५०’ चित्रपटातील संगीताप्रमाणे असल्याचे वाटत होते. रिपोर्टनुसार हे संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांचे आहे. ट्रेलरमध्ये देवी श्री प्रसाद यांचे संगीत वापरून देखील त्याना त्यांच्या कामाचे श्रेय देण्यात आलेले नाही. परंतु निर्मात्यांनी आतापर्यंत यासंबंधतीत कोणतही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Leave a Comment