तुम्ही पाहिला का अक्षयचा तृतीयपंथीय लूक ?


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट येत आहे. गेल्या काही वर्षांत वेगळ्या धाटणीच्या भूमिका ‘अॅक्शन हिरो’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय निवडत आहे. यातील एक भूमिका म्हणजे ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातील. या चित्रपटात एका तृतीयपंथीयाची भूमिका अक्षय साकारत आहे.


अक्षयने नवरात्रीच्या मुहूर्तावर या चित्रपटातील स्वत:चा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. नवरात्री म्हणजे तुमच्या आत असलेल्या शक्तीपुढे नतमस्तक होणे. मी लक्ष्मीचा पहिला लूक या शुभ मुहूर्तावर तुमच्यासमोर आणत आहे. ही भूमिका साकारताना मी उत्सुकही होतो आणि मला भीतीही वाटत होती. पण तुम्ही चौकट जेव्हा मोडता तेव्हाच नव्या आयुष्याला सुरूवात होते, असे कॅप्शन लिहित अक्षयने त्याचा पहिला लूक रिलीज केला आहे.

अक्षयसाठी ही भूमिका चाकोरीबाहेरची होती आणि त्याने यासाठी विशेष मेहनत घेतली. दक्षिणेतील गाजलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कंचना’चा हा चित्रपट रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स करणार असून अक्षयसोबत किआरा अडवाणीही देखील पहायला मिळणार आहे. हा चित्रपट ५ जून २०२० ला रिलीज होणार आहे.

Leave a Comment